पुणे

“दोन कोटी निधी देतो 40 लाख ठेवा, बाकी खर्च करा. पण शिंदे गटात या” “शिंदे गटाकडून शिवसेना जिल्हाप्रमुखाला अजब ऑफर

पुणे ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना कि शिंदे गटाची शिवसेना हा वाद चव्हाट्यावर असतानाच पुणे जिल्हाप्रमुखाला शिंदे गटाकडून दोन कोटी निधी सरकारकडून देतो 40 लाख तुम्हाला ठेवा एक कोटी साठ लाख खर्च करा, पण शिंदे गटात या अशी आश्चर्यकारक ऑफर दिल्याने पुण्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मात्र या जिल्हाप्रमुखाने मला निधी नको मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी शिवसेना सोडून जाणार नाही असे फटकारल्याने, शिवसेना गट कोणत्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे हा चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यात शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार भाजप सोबत गेले व राज्यात सत्ता स्थापन केली या सर्व सत्ता संघर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मात्र शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात राहिल्याने ठाकरे यांचे सहानुभूती वाढली आहे, त्यातच ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी शिंदे गट कोणत्याही थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय पुण्यामध्ये नुकताच आला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक असलेल्या एका नेत्याला शिंदे गटाकडून एक ऑफर आली या ऑफर मध्ये शिंदे गटाकडून म्हटले आहे की तुम्हाला दोन कोटी निधी देतो या निधीतील 40 लाख तुम्हाला ठेवा व एक कोटी साठ लाख निधी तुमच्या प्रभागात खर्च करा, पण त्यासाठी अट एकच शिवसेना सोडून शिंदे गटात या अजब ऑफरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, मात्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने ऑफर धुडकावत मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार असून मी कोणत्याही आमिषाला बळी पडून शिवसेना सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
राज्यात अशी चर्चा आहे  महाराष्ट्रात शिंदे गटाने अनेकांवर ऑफरचा भडिमार सुरू केला, काही करून शिवसेना फोडायची आणि राज्यात आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला दणका द्यायचा असा प्रयत्न सुरू केलेला असतानाच पुणे शहर व जिल्ह्यात मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, पुण्यातील अजय भोसले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमश कोंडे वगळता पुणे शहरातून जास्त काही प्रतिसाद शिंदे गटाला मिळाला नाही, त्यामुळे शिवसेना फोडण्यासाठी आता आर्थिक ऑफर देऊन शिवसेनेच्या इच्छुक नगरसेवकांना व माजी नगरसेवकांना जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले आहे मात्र कट्टर शिवसैनिक या ऑफरला धुडकावून लावत असल्याने शिंदे गटाचे भविष्यात काय होणार ल याची चुणूक या निमित्ताने दिसून आली आहे काल दहीहंडीचा कार्यक्रम होता हडपसर येथे एका दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती, आमदारांसमोरच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी कबुली दिली की मला शिंदे गटाकडून ऑफर आली त्यांनी दोन कोटींचे आमिष दाखविले दोन कोटी मधील 40 लाख ठेवा व एक कोटी साठ लाख तुमच्या प्रभागात खर्च करा मात्र शिंदे गटाने मात्र ही अट आणि ऑफर धुडकावून लावल्याचे त्यांनी जाहीर भाषणात सांगितल्याने पुण्याच्या व हडपसरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या जिल्हाप्रमुखाला 2 कोटींची ऑफर कोणी दिली, हा प्रश्न सर्वांना पडला आहे, राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे, सत्तेसाठी काय पण अशीच परिस्थिती असून आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व होणार की निष्ठावंत शिवसेनेचे शिलेदार पुन्हा निवडून येणार हा कळीचा मुद्दा ठरला आहे.