पुणेहडपसर

एस. एम. जोशी कॉलेजने सद्भावना दिवसाची घेतली प्रतिज्ञा

हडपसर 
प्रतिनिधी

एस. एम. जोशी कॉलेजमधील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली. जात , वंश , धर्म , प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवावेत. तसेच भारताच्या विविधतेत एकात्मतेची भावना दृढ व्हावी. राज्यातील विविध प्रदेशात अनेक धर्माच्या अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड साहेब, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. संजय जडे सांस्कृतिक विभागाच्या चेअरमन डॉ.शिल्पा शितोळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना जाधव, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ.अतुल चौरे तसेच बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.