औरंगाबाद

पत्रकाराच्या घरावर विस ते पंचविस लोकांचा जीवघेणा हल्ला..! हल्यात पत्रकाराचा मुलगा गंभीर , पत्नीला ही मारहाण करून दागिने घेऊन आरोपि फरार पिशोर येथील कजबा गल्ली मधील घटना..! पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मात्र आरोपि आद्यप मोकाट

औरंगाबाद कन्नड प्रतिनिधि मिलिंदकुमार लांडगे

कन्नड तालुक्यातील पिशोर गावातिल जेष्ठ पत्रकार सय्यद आरेफ़ यांच्या घरावर हल्ला करीत दगड फेक केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली, या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की,
घरात शेजारील रहिवासी शेख शफीक उर्फ अन्ना, व त्याची पत्नी रईसा बी शेख, यांनी पत्रकार सय्यद यांच्या घरासमोर प्याक केला पत्रा कारण नसतांना वाकवला, त्यावर माझी पत्नी फरिदा बी व रईसा यांच्या आपापसात बोला- बोली झाली मी व गावातील जुम्मा खा यांनी दोघांना समज देत हा तंटा मध्यस्थीने जागेवर येऊन मिटवला. त्यानंतर माझा लहान मुलगा सय्यद शोहेब हा जामा मजीद मध्ये सायंकाळी सात वाजेच्या नामाजासाठी गेला नमाज पठन करून तो घरी आला व त्याने दरवाजा केवळ लोटला होता त्याचा पाठलाग करून विस ते पंचविस लोक घरात घुसले व मधि येऊन मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यांचे नाव शेख शफीक उर्फ अन्ना, शेख राईसा शफीक,मुजेफ शेख शफीक,अतीक शेख अजीज,आदिल शेख फकरु,शाहरुख शेख नजीर,मोबिन शेख कलीम, ताहेराबी शेख अजीज, यांच्या सोबत अन्य लोक घुसले त्यांनी मुलगा सय्यद शोहेब यास लाथा बुक्क्याने काठीने ,लोखंडी रॉड,व दगड फेक करून मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्याच्यात बाहेरून एक दगड त्याच्या तोंडावर लागला येऊन त्यापैकी शेख शफीक अन्ना ,व त्याचा भाऊ अतीक यांनि माझ्या पत्नीला केस ओढून मारहाण करून गळ्यातिल सेवन पीस वर त्यांचीनजर फिरली त्यांनी सेवन पीस हिसकवून नेले व वाइट् हेतुने निर्लज्ज कृत्य केले.शोहेब याच घरात मारत मारत ओढून नेले व भारत बाहेर उभे असलेले जमावत टाकले त्या जमावांनी त्याला पण लाठ्या काठयाने मारहाण करण्यास सुरुवात केली, इतकं पाहून मी मध्यस्थी त्यांनी करत असताना त्यांनी मालाहील लाता बुकयांनी डोक्यावर मारहान केली, त्याचवेळी माझा मुलगा शोहेब यास घरात ओढून शेख शफीक,अजीज,शेख शाहरुख, यांनी त्यांच्या हतातील लोखंडी गज, लाठ्या काठयाने त्याच्या डोक्यावर हात पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली व आम्हाला धमकी दिली सर्व कुटुंबाला मारुन टाकल्या शिवाय शांत बसणार नाही, तुमच्या वर जर खोटे गुन्हे दाखल नाही केले तर मि नावाचा अन्ना नाही अशी धमकी देण्यास सुरवात केली, त्यावेळी गल्लीतील शेख कैसर ईस्माईल,अमजत फिरोज़ खा,जावेद शेख, हे यांनी या भांडणात मध्यस्थी केले त्यानंतर मी माझी पत्नी व मुलगा आणि पोलीस ठाणे येथे गेलो यांनी मेडिकल मेमो घेऊन उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले त्यांना परिस्थिति गंभीर दिसल्याने अधिक उपचार मिळवण्यासाठी त्यांनी मुलाला पत्नीला औरंगाबाद येथे रेफर व त्यांनी तिथे दोन दिवस उपचार घेतले, संबंधित व्यक्तिवर कलम भा,द,वी 354-ए,452,324,143,147,148,149,323,504,506, या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे , तसेच पोलिस तपासत अजुन नाव निर्देशनात आले तर कार्यवाही होणार असल्याची माहिती मिळत आहे,पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली बिट अमलदार किरण गंडे करीत आहे,

अतिक्रमणामुळे वाद दंगल चे स्वरूप ग्रामपंचायत ने आता पर्यंत का केले नाही अतिक्रमणावर कारवाई….?

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील कसबा गल्ली भागातील पत्रकार सय्यद यांचे गल्लीत सध्याला ही भल्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे शासन दरबारी आठ ते दहा फुटाची गर्दी गल्ली सध्याला तीन ते चार फुटावरून पडली आहे एकीकडे या गल्लीतून दोन दोन बैलगाडे एक सोबत जायचे आता सध्याला मुळे एक मोटरसायकल जायलाही मुश्किल झाली आहे राहिलेलं चार फुटावर राहिलेल्या चार फूट गल्लीवरही संबंधित त्यांनी विनाकारण न उपयोगी येणारे वस्तू अडचण करून ठेवले आहे काहींनी अक्षरशः घरातील डबे तुटलेले तुटलेल्या फरश्या त्यासोबत पाण्याचे पाण्याचे डबे ट्युशन दिवस पायऱ्या पुढे करत करत गल्ली एकदम छोटी करून टाकलेली आहे सध्याच्या स्थितीला गल्लीत रस्ता की रस्त्यात गल्ली अशी परिस्थिती करून टाकली आहे तसेच या गल्लीत विश्वासू माहिती सूत्राच्या आधारे माहिती मिळाली आहे की राजकीय लोकांचा वावर जास्त आहे त्यामुळे येथिल अतिक्रमण काढनार- तर कोन काढनार अशी परिस्थिति झाली आहे, पिशोराच्या गावाची लोकसंख्या जास्त आल्याने तालुक्यात लोकसंख्यांच्या बाबतीत अव्वल मानला जातो, बहुतांश जागी सीमेंट कॉन्क्रीट चे रस्ते बनले आहे,मात्र पत्रकार सय्यद यांच्या गल्लीत स्वतंत्रता पासून अद्याप रस्ता बनला नाही याचा गैर फायदा घेत लोकांनी अडमाप अतिक्रमण करून घेतले आहे, संबंधित प्रकरण जनतेच्या समोर आल्याने ग्रामपंचायत तत्काळ काय कार्यवाही करणार यां कड़े सर्वांचे लक्ष आहे..

सय्यद कुटुंब 1947 पासून 2019 पर्यंत पोलिस विभागात कार्यरत…!
पत्रकार सय्यद आरेफ़ यांचे वडील पोलीस विभागात होते, स्वतंत्र पासून त्यांचे वडील नौकरी करीत होते, त्यांचे वडीला नंतर त्यांचे मोठे बंधू हे पण पोलीस दलात भरती झाले त्याच्या नंतर त्यांचे मधले बंधू हे पण पोलीस दलात भरती होऊन सीआयडी विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते, ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे, त्यांचे धाकटे भाऊ भारतीय सैन्य दलात होते ते पण सेवानिवृत्त झाले आहे, तसेच सय्यद आरेफ़ हे मागील 30 वर्षापासून विविध नामांकित दैनिकात आणि टीव्ही चॅनल मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहे मात्र त्यांच्या घरावर हल्ला करून मारहाण केल्याने चित्र विचित्र प्रश्न उपस्थित होत आहे? पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सय्यद कुटुंबाला पोलीस विभाग योग्य न्याय देतील का? संबंधितांवर कड़क कारवाई होणार का? त्यांना अटक होणार का? की त्यांना अटक होणार की फरार दाखवणार? या सर्व गोष्टीवर सर्वांचे लक्ष वेधले आहे, तसेच मोठ्या प्रमानात 20 ते 25 जनावर योग्य कारवाई न केल्यास पत्रकार संघटना व भारतीय दलित कोब्रा संघटनाचे प्रदेश अध्यक्ष अशोक बोर्ड हे संबंधित 20 ते 25 दंगलखोर व्यक्तिवर दंगलीचा गुन्हा दाखल करून कलम 307 दाखल करण्यात करावी या मागणी साठी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे या बाबत दाद मागणार अशी माहिती मिळत आहे.