हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व कदमवाकवस्ती नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्या करता प्रक्रिया राबिवण्यात अली दिनांक 29 ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामसेवक अमोल गोळवे ग्रामपंचायत कदमवाकवस्ती ता.हवेली जि. पुणे यांच्या देखरेखे खाली पार पडली.
ग्रामपंचायत कदमवाकवस्ती राहावी किंवा त्याचे रुपांतर नगरपंचायती मध्ये व्हावे या साठी आज विशेष मतदानाचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये कदम वाकवस्ती मधील बहुतांश नागरिकांनी या मतदान प्रक्रियेला प्रतिसाद दिला.
या वेळी कदम वाकवस्ती ग्रामपंचायत राहावी या साठी ९४५ मते नागरिकांनी दिली, व नगरपंचायत व्हावे यासाठी ४८५ मते नागरिकांनी दिली, या मध्ये कदम वाकवस्ती ही ग्रामपंचायत च राहावी या कडे जास्त नागरिकांनी कौल दिला असे निष्पन्न होते. या वेळी मतदान प्रक्रिये साठी श्री. अतुल कोहिनकर ग्रामसेवक ग्रा.प. काळवाडी,श्री. सुनील सुठेकर ग्रामसेवक पं.स.हवेली,श्री. प्रकाश गळवे ग्राविअ प.स.हवेली,श्री. विलास भापकर ग्राविञ प.स.हवेली, श्री. नथुराम ढवळे ग्राविअ प.स.हवेली या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
या मध्ये कदम वाक वस्ती ग्रामपंचायत चे ग्रामसेवक अमोल गोळवे यांनी निकाल स्पष्ट करताना सांगितले की,दिलेला निकाल या मध्ये पडताळणी केली जाणार असून पूर्ण तपासणी करूनच पुढील निर्णय देण्यात येईल.
या वेळी मतदान प्रक्रिये मध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.या मध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन चा कडक बंदोबस्त पाहण्यास मिळाला, व मतदान प्रक्रिया पार पडली.