हडपसर,वार्ताहार. ” शिक्षक केवळ वर्गातील विद्यार्थी घडवत नाहीत तर शिक्षक समाजालाही मार्गदर्शन करतात.समाजाला दिशा देऊन प्रगतीपथावर नेण्याचे काम करतात.शिक्षकाच्या उंचीवर समाजाची उंची अवलंबून असते. समाजासाठी दीपस्तंभ म्हणून शिक्षक काम करतात. शिक्षक खऱ्या अर्थाने समाज घडवतात असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन
यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम ,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते ,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत,सांस्कृतिक विभागप्रमुख ,संगिता रूपनवर सविता पाषाणकर ,राजश्री आफळे ,वैशाली भोसले यांनी केले होते.शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले व शिक्षकाच्या कामाचा अनुभव घेतला.
यानिमित्ताने धैर्यशील आखाडे,शंभूराजे देवकर ,श्रद्धा देवधर ,सिद्धी भोसले ,सम्यक सोनकांबळे,प्रथमेश डोणगावे,पूर्वा हाडवळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत सोनाली पाटील, कौसरबानू इनामदार,ज्ञानेश्वर सरोदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र रणवरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व रूपाली सोनावळे यांनी केले तर आभार अमृता माळवदे यांनी मानले.