प्रतिनीधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी प्रज्वल धवडे हा गुन्हा घडल्या पासून एक वर्ष आपले नाव व ओळख लपवून फरार होता.
प्रज्वल नामदेव धवडे( वय – २३ रा. भिगवन, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या अगोदर रोहिणी भातुलकर, तोफिक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले,प्रतीक लांडगे, व एक अनोळखी इसम सर्व रा. उरुळी कांचन (ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील प्रज्वल धवडे हा फरार होता.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व आरोपी फरार असल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकातील पोलीस निरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदारांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या,त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार, व बाजीराव वीर यांना एका खबर्यामार्फत खबर मिळाली की प्रज्वल धावडे हा फरार आरोपी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी शाळेजवळ येणार आहे.
खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांना सदर गोष्टीची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी तपास पथकासह गेले असता सदर आरोपीला चाहूल लागतात आरोपी त्या ठिकाणावरून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता व अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रज्वल धवडे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस निरीक्षक अमित गोरे, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, पुंडे, यांच्या पथकाने केली आहे.