कवठे यमाई (धनंजय साळवे) – ग्रामिण भागातील शेतकरी व पशुपालक सध्या जनावरांच्या लम्पी आजाराने धास्तावले आहेत.शेतकर्यांना आधीच ओल्या दुष्काळाने त्रस्त केले आहे कांदा टोमॅटो या नगदी पीकांना बाजार नाही.शेतकर्यांना आपले कुटुंब चालवायला गायीच्या दुधाच्या पगारावर कसाबसा आपला संसार चालवावा लागतोय. त्यात ह्या आजाराने डोके वरती काढले आहे.या आजाराने बैलगाडा शर्यतीवरही मर्यादा आल्या आहेत.हा आजार विषाणुजन्य आहे व अतिसंसर्गशील आहे.हा विषाणु देवी प्रवर्गातील कॅप्रीपाॅस गटातील आहे.या रोगाचा प्रसार चावणार्या माशा, डास,गोचीड,चिलटे यापासुन होतो.बाधीत जनावरांच्या संपर्कात चांगले जनावरे आल्यानंतर तसेच दुषित चारा व पाणी पिल्यानेही हा आजार होऊ शकतो.या आजाराची लक्षणे अंगावर मोठ्या गाठी,सुरवातीला भरपूर ताप,डोळ्यातुन नाकातुन चिकट स्राव,चारा पाणी खाणे कमी किंवा बंद तसेच जनावर दुध देण्यास कमी होते.काही जनावरांच्या पायाला सुज येऊन लंगडत चालतात.या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवुन माशा डास किटक गोचीड यावर नियंत्रण ठेवणे,जनावरांचवर उपचार करताना नविन सिरींज वपरावी,गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती तसेच डॉक्टरांचे निर्जंतुकीकरण करावे,आजाराची साथ असेपर्यंत जनावरांची खरेदी विक्री थांबवावी.पशुपालकांनी बाधीत जनावरे तात्काळ वेगळी ठेवावी,गोठ्यामध्ये सोडीअम हायपोक्लोराईड व फिनेल यांची फवारणी करावी.जनावरांना आयव्हरमेक्टींग इंजेक्शन दिल्यासकिटक गोचिड यांवर नियंत्रण येते.गावातही ग्रामपंचायत मार्फत डास मच्छर यावर नियंत्रणासाठी फवारणी करावी.लम्पी आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पशुपालक व पशुसेवक डॉ.प्रविण भालेराव यांनीही शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली व डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला तर या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.
पशुपालक जनावरांच्या लम्पी आजाराने काळजीत
September 13, 20220
Related Articles
January 31, 20240
मैत्रिणींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने बलात्कार करणारे जेरबंद
हडपसर पोलिसांची कारवाई ः
पुणे, दि. ३१ ः मैत्रिणींना फिरायला नेण्याच्या बहा
Read More
August 28, 20230
नातेवाईक तरुण मुलीवर अत्याचार करून,व्हिडीओ काढून 30 लाख उकळले….!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुण
Read More
December 6, 20230
महापुरूषांचे विचार आचरणात आणावेत : प्राचार्य दत्तात्रय जाधव.
हडपसर,वार्ताहर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारताचे पहिले कायदामंत्री ,प
Read More