हडपसर (प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्रा. उमेश शिरसट यांना 2019 या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकामधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा . संजय जडे, प्रा. डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठाकरे उपस्थित होते.