हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे वक्तव्य दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यातील पहिल्या पाच गाड्यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपने भरलेल्या गाड्यांचे स्वागत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात दौंडचे आमदार राहुल कुल, कदमवाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल बोलत होते.
यावेळी ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, माजी सरपंच गणपत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नासीर पठाण, सचिन दाभाडे, माधुरी काळभोर, राजश्री काळभोर, रुक्मिणी चांदणे, सविता साळुंके, अविनाश बडदे, दीपक काळभोर, समीर शेंडगे, माउली काळभोर, गौरव काळभोर, विकी नामुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या कि, “जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. काम पुर्ण करण्याचा क्रम (वर्क ऑर्डर) झाला असून येणाऱ्या महिन्यात या कामाचा शुभारंभ होणार आहे. एक महिन्याच्या आत हि योजना सुरु होणार आहे. तत्पूर्वी कदमवाकवस्ती येथील ग्रामस्थ पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे गेले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीटंचाईची समस्या लवकरच दूर होणार आहे.”