हवेली

लोणी काळभोर : आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन लोणी काळभोर

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे असे मत हवेली तालुका वनविभागाचे वनरक्षक बळीराम वाईकर यांनी केले.
लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील तीर्थक्षेत्र रामदरा नजिकच्या महादेव मंदिर परिसरात डोंगरात ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बळीराम वाईकर बोलत होते. या वेळी अनिष काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद काळभोर, अमित काळभोर, अतुल काळभोर, सचिन झेंडे, संतोष काळभोर, हर्षल काळभोर, अमित जगताप, दत्तात्रय शेंडगे, बिरूदेव भास्कर, विनोद यादव, सिद्धार्थ खंडागळे आदी उपस्थित होते.   

या वेळी बोलताना बळीराम वाईकर पुढेमतोल राखणे काळाची गरज आहे असे मत हवेली तालुका वनविभागाचे वनरक्षक बळीराम वाईकर यांनी केले.
लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील तीर्थक्षेत्र रामदरा नजिकच्या महादेव मंदिर परिसरात डोंगरात ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बळीराम वाईकर बोलत होते. या वेळी अनिष काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद काळभोर, अमित काळभोर, अतुल काळभोर, सचिन झेंडे, संतोष काळभोर, हर्षल काळभोर, अमित जगताप, दत्तात्रय शेंडगे, बिरूदेव भास्कर, विनोद यादव, सिद्धार्थ खंडागळे आदी उपस्थित होते.   

या वेळी बोलताना बळीराम वाईकर पुढे म्हणाले पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण विपुल होते. त्यासोबत माणसाला शुद्ध हवा मिळाल्याने माणसाचा जीवनकाळ देखील जास्त होता. जंगले मोठ्या प्रमाणात असल्याने पाऊस देखील खुप मोठ्या प्रमाणात पडायचा. तसेच प्रदूषणाचे प्रमाण देखील खूप कमी होते. या वेळी पळस, वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांभूळ, लक्ष्मीतरू, खैर, उंबर, करंज आदी प्रकारची १०१ देशी झाडे लावण्यात आली. यावेळी बळीराम वायकर यांचा सत्कार अनिष काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला.