हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
कदमवाकवस्ती : पुर्व हवेलीतील शिवसेना शिंदे गटाची दसरा मेळावा व पदाधिकारी नियुक्ती संदर्भातील बैठक उरूळी कांचन येथील एलाईट हॉटेलमध्ये पुणे जिल्ह्याचे संघटक निलेश काळभोर यांच्या यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. यावेळी पुर्व हवेलीतील पदाधिकारी हरीष कांचन, सागर फडतरे,धनश्री म्हस्के, अजिंक्य चौधरी,अक्षय कुंजीर, विनोद बेंगळे, मयुर काळभोर,नानासाहेब जवळकर,नितीन जगताप,आप्पासाहेब गोरे,अमर चौधरी,निखिल गायकवाड,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या रविवारी(दि.२)शिरूर हवेलीचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथील निवास्थानी उपस्थित राहून पदाधिकारी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दसरा मेळाव्याची नियोजन संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती.