मुंबई

माहिती महासंचालक जयश्री भोज यांना डिजिटल मिडिया संघटनेच्या शुभेच्छा!

मुंबई, -महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांची आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली.
      डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यातील वाटचालीची माहिती देतानाच समस्या व प्रश्नही त्यांच्यापुढे मांडले.तसेच २९ ऑक्टोबर २०२२ रोजी महाबळेश्वर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाची माहिती दिली.तसेच भोज यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची आठवण माने यांनी त्यांना दिली.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त राजा माने लिहलेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”हे पुस्तक भोज यांना भेट देण्यात आले.