पुणेहवेली

जनहित फाउंडेशन च्या वतीने समाजातील सज्जनशक्तीचा प्रत्यय…….

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

 आपण सातत्याने समाजात चांगली माणसे राहिली नाही असे बोलत असतो,परंतु काल एक चांगला अनुभव आला असे बोलताना प्रवीण काळभोर
संस्थापक/अध्यक्ष,जनहित सोशल फाउंडेशन.
उपाध्यक्ष,भाजपा,पुणे यांनी बोलताना सांगितले
कदम वाकवस्ती गावा मध्ये रहिवाशी असलेले ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज मासाळ हे प्रवीण काळभोर यांना भेटले त्यांनी सांगितलं की,त्यांना आत्ताच डोळे आणि नाक यामधील नसेला कॅन्सर सारखा दूर्धर आजार डिटेक्ट झाला व बार्शी येथील नर्गिस दत्त हॉस्पिटल येथे त्यांचे ऑपरेशन झाले,परंतु यामध्ये त्यांचा एक डोळा निकामी झाला. या सगळ्या कालावधीमध्ये त्यांची असलेली नोकरी ही त्यांना गमवावी लागली आणि अतिशय सुखी असलेला त्यांचा संसार अडचणीत आला. आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना सांप्रदायिक क्षेत्रामध्ये एक उत्तम मृदंगाचार्य म्हणून महाराजांची समाजात ओळख आहे. त्यामुळे लोणी काळभोर,कदम वाकवस्ती येथील सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी या कालावधी महाराजांना मदत करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना काही टेस्ट करणं आवश्यक आहे व त्यासाठी त्यांना काही रकमेची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. प्रवीण काळभोर
संस्थापक/अध्यक्ष,जनहित सोशल फाउंडेशन.
उपाध्यक्ष,भाजपा,पुणे यांनी नुकत्याच सुरू केलेल्या जनहित फाउंडेशन मधील आपल्या सदस्यांना ही गोष्ट व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर केली आणि आनंद वाटतोय की महाराजांना लागणारी रक्कम काही तासांमध्ये जनहित परिवाराच्या सदस्यांनी जमा केली व आज संबंधित दवाखान्याला पाठवून दिली याबद्दल प्रवीण काळभोर यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले .यामधून हे पाहायला मिळते की समाजातील सज्जनशक्ती ही संपलेली नसून ती केवळ विखुरलेली आहे.या सज्जनशक्तीला पुढील काळामध्ये एकत्रित करून जनहित सोशल फाउंडेशन आपल्या परिसरामध्ये चांगलं काम उभे करेल आणि जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने समाजातील उपेक्षितांसाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला. पुन्हा एकदा जनहित परिवारातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार ….

प्रवीण काळभोर
संस्थापक/अध्यक्ष,जनहित सोशल फाउंडेशन.
उपाध्यक्ष,भाजपा,पुणे (ग्रा).