रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय, हडपसर, येथील गणित विषयाचे अध्यापक कुमार हिंदुराव बनसोडे यांना रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त “मा.बाबुराव सणस स्मृती उपक्रमशील शिक्षक पुरस्कार” रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय चेअरमन अॅड.आमदार राम कांडगे यांच्या हस्ते, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार , तसेच पश्चिम विभागातील मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
तसेच नितीन जगदाळे यांना रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी सातारा येथे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जनरल बाॅडी सदस्य सारंग पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.या वेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील , व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव विठ्ठल शिवणकर,सहसचिव राजेंद्र साळुंके ,साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
कुमार बनसोडे यांनी गेली तीस वर्षे संस्थेच्या विविध विद्यालयांमध्ये काम केले असून, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, रयत ओलंपियाड परीक्षा, नॅशनल ओलंपियाड परीक्षा, अशा विविध स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन केलेले आहे. विद्यालयातील एकूण पंधरा विद्यार्थ्यांना रयत ऑलिं पियाड ची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे तसेच नॅशनल सायन्स ऑलिं पियाड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 29 पदक व 238 प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत, त्यांनी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत गणित विषयाचे एक्झामिनर तसेच मॉडरेटर म्हणून काम केले आहे .त्यांचा बोर्ड परीक्षेचा गणित विषयाचा निकाल सलग दहा वर्षे 100% लागला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागातील इतर शाखांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील,जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे,अरविंद तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी ,सहविभागीय अधिकारी शंकर पवार,विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.