पुणे (प्रतिनिधी )
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटालाअर्थात बाळासाहेबांची शिवसेनेला कुठले चिन्ह मिळणार, याबाबत महाराष्ट्रभर उत्सुकता होती. अखेर आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे. त्यावर शिंदे गटाचे अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी याचे स्वागत केले आहे. भानगिरे म्हणाले, ढाल तलवार हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. तशी योजना आखण्याचे काम सुरु आहे. पुण्यात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या भव्य आधुनिक कार्यालयाचे काम सुरु करण्यात आले असून २४ तास कार्यालय सुरु राहणार असल्याचे भानगिरे यांनी जाहीर केले आहे.
राज्यभर ज्या विषयाची जोरदार ज्या विषयाची चर्चा सुरु होती ते म्हणजे दोन्ही शिवसनेच्या गटांना कोणते चिन्ह मिळणार याची, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले, शिंदे गटाच्या पदाधिकारती व कार्यकर्त्यांनी याबद्दल जल्लोष व्यक्त केला,
नाना भानगिरे यावेळी बोलताना म्हणाले, चिन्ह मिळल्यामुळे आनंद झाला आहे. पक्ष वाढीसाठी आता प्रयत्न केले जातील. पुणे शहरात आता जोमाने काम सुरु होईल. पुढील आठवड्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये शहराच्या प्रश्नाबाबत आढावा घेऊन नियोजन केले जाईल. यामध्ये खास करून शहराचे रखडलेले प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, 40% टॅक्स सवलत, 34 गावांना आवश्यक 9 हजार कोटींचा निधी, रस्त्यावरील खड्डे, सांडपाणी प्रकल्प, नदी सुधार योजना, मेट्रोचा विस्तार अशा सर्व विषयावर चर्चा केली जाईल. तसेच यामध्ये गती आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच याबाबत कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्याना सूचित केले जाईल. असे ही भानगिरे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे गटाचे पुण्यात साकारतेय आधुनिक संपर्क कार्यालय…
पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यालयाचे काम पुण्यात सुरु करण्यात आले हे कार्यालय २४ तास सुरु असणार आहे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथे नियोजन केले जाईल. संपर्क कार्यालयात नागरिकांना सर्व सुविधा व योजनांचा लाभ होईल.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख – बाळासाहेबांची शिवसेना पक्ष – पुणे