बीड

ऐतिहासिक ठेवा असणारे 26 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे पार पडणार : संमेलन अध्यक्ष म्हणून पुणे येथील पौलस वाघमारे तर स्वागत अध्यक्ष म्हणून आशिष शिंदे यांची निवड

26 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन दि.6,7 व 8 नोव्हेंबर रोजी बीड येथील रेव्ह.नारायण वामन टिळक नगरी ए.जी.चर्च येथे आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी झालेल्या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम साहित्यिक पौलस वाघमारे यांची कार्यकारणी ने निवडणूक न घेता निवड केली. तर बीड येथील मराठी ख्रिस्ती साहित्य संघाने स्वागताध्यक्ष म्हणून अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली.

26 व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाची आढावा बैठक विद्याभवन चर्च येथे पार पडली.यावेळी वसई येथील ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष डाँ.नाझरेथ मिस्किटा यांनी बोलताना प्रथमच बीड सारख्या लहान शहरात हे संमेलन आम्ही आयोजित करीत असून ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी मराठी ख्रिस्ती साहित्याचा प्रकाश पोहचला पाहिजे व मराठी भाषेची सेवा करता यावी यासाठी बीड येथे हे संमेलन आयोजित करीत आहोत.

या संमेलनात ग्रंथ दिंडी, परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, किर्तन, भजन, ज्वलंत विषयावर चर्चासञे असे भरगच्च कार्यक्रम पार पडणार असून मराठी ख्रिस्ती साहित्य ही उपलब्ध होणार आहे. स्मरणिका ही प्रकाशित होणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक येणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.