पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे );
उरुळी कांचन येथे भाजपचे नेते अजिंक्य कांचन यांनी १०० रुपयांत् दिवाळीच्या सामानाचे किट गोरगरिबांना वाटप केल्यामुळे त्यांच्या घरी दिवाळीचा फराळ पोहचण्यास मदत झाली आहे तसेंच दिवाळीच्या किटने दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे मत भाजपचे नेते अजिंक्य कांचन यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने १०० रुपयांत उपलब्ध करुन दिलेल्या दिवाळी किटचा वाटपाचा शुभारंभ ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथे रविवार (दि. २३) रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या योजने अंतर्गत हवेली पंचायत समिती माजी उपसभापती व विद्यमान सदस्य हेमलता बाळासाहेब बडेकर यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानांमध्ये या दिवाळी किटचे वाटप करण्यात् आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच राजेंद्र कांचन, उपसरपंच अनिता तुपे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले आणि असंख्य लाभार्थी उपस्थित होते.
हवेली तालुक्यात पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सुरेखा माने, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, नायब तहसीलदार संजय भोसले, पुरवठा निरीक्षक मुलानी यांच्या माध्यमातून रेशन धारकांना दिवाळी चे किट दिवाळीच्या अगोदर पोहचविण्यासाठी पुणे जिल्हा पुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे,असे सांगण्यात आले.