पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
“पुणे तिथे काय काय उणे” या उक्तीचा प्रत्यय नेहमीच पुण्यात येत असतो कारण पुण्यातील लोक कुठल्याही गोष्टीसाठी फार उत्साही ,उत्सुक असतात आणी त्यात तर काल आपल्या असणाऱ्या सणांपैकी सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने पुण्यात साजरा करण्यात आला शहरात लक्ष्मी पुजनानंतर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने दोन तासात सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत, त्यात प्रामुख्याने बी टी कवडे रस्त्यावर लागलेल्या आगीत ८ दुचाकी जळाल्या आहेत, तर इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले त्यामुळे मोठ्या दर्घटना टळल्या , अशी माहिती अग्निशमन दलाचे जवान निलेश महाजन यांनी दिली.
दिवाळीनिमित्त संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत आगीच्या सहा घटना घडल्या आहेत, त्यामध्ये जनता वसाहत, गल्ली क्रमांक ४७ येथे झाडाला आग लागली होती, तर काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीसह बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह सोसायटीत लागलेल्या आगीत ८ दुचाकी जळाल्या तर, न्हरेतील तानाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग लागल्यावर ती ताबडतोप वीजवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ झाडासह वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली , जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तेथिल आगीवर नियंत्रण मिळवले, सुदैवाने कुठल्याही ठिकाणी आगीत जीवित हानी झाली नाही.