पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
पुण्यातील कात्रज परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, यामुळे संपूर्ण कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे, कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास एक महिलेचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला असून मृतावस्थेत आढलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
भारती विद्यापीठ पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकाडून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारी आल्या आहेत का हे पडताळून मृतदेहाची ओळख पटवण्यात येईल असे सांगण्यात आले.
तसेच महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला, मात्र, प्राथमिक तपासात महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी अग्निशामक दलाकडून तांडेल, वसंत भिलारे, फायरमन प्रसाद कदम, निलेश राजीवडे, शुभम शिर्के, अविनाश लांडे, ड्राइवर गोगावले उपस्थित होते,
या सर्व घडलेल्या घटनेवर बोलताना कात्रज परिसरातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, तब्बल २९ एकर जागेमध्ये पेशवे तलाव आहे. येथे रात्र दिवस एक सुरक्षा रक्षकाची आहे कारण, तलावाजवळील रस्ता खुला असल्याने परिसरातील लोक ये जा करत असतात. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश ठेवणे कठीण आहे असं यावेळी वसंत मोरे म्हणाले,
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहोत.