पुणे

“सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व जिवंत २ काडतुस हस्तगत : मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर पथकाची धडाकेबाज कामगिरी”

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकास गोपनीय बातमी मिळाली की, मुंढवा चौकाकडुन मगरपटटा जाणा-या मुख्य रस्त्याच्या ब्रीज खाली, मुंढवा, पुणे येथे इसम नामे अविनाश सुनिल जगताप हा स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगुन फिरत आहे, मुंढवा पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत या गुन्हेगारास ताब्यात घेतले आरोपीकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत.

अविनाश सुनिल जगताप वय २९ वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी मुंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांना तपास पथकातील इतर अंमलदार यांचेसह रवाना केले होते. सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांनी त्यांचे कुशलतेने सदर ठिकाणी साध्या वेशात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावला. सदर ठिकाणी एक इसम हा संशायीत रितीत व कावरे बावरे अवस्थेत हालचाल करतांना दिसला. म्हणुन सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व प्रशांत माने व तपास पथकातील अंमलदार यांनी सदर इसमास पकडले. त्यावेळी दोन पंचाना बोलावुन घेवून सदर संशयीत इसमास नाव पत्ता विचारले असता, अविनाश सुनिल जगताप वय २९ वर्षे, रा. चव्हाण चाळ, गोपी मेडीकल, २२६ मंगळवार पेठ पुणे असे सांगितले. पंचासमक्ष अंगझडती घेता, त्याचे पॅन्टचे आत मागील बाजुस कंबरेस खोचलेले लोखंडाचे गावठी पिस्टल मॅगझीनसह त्यामध्ये ०२ जिवंत काडतुसे किंमत रुपये १७,०००/- चे मिळुन आले. सदरचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे त्याने विना परवाना जवळ बाळगले त्याबाबत मुंढवा पो.स्टे येथे गुन्हा रजि. नंबर २८८/२०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे कायदेशीर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयामध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
आरोपी अविनाश सुनिल जगताप या आरोपी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर येथे शरिराविरुध्दचे दोन गुन्हे दाखल असुन तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे. वरील कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ श्रीमती नम्रता पाटील, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे, राजू कदम, महेश पाठक, राहुल मोरे, सचिन पाटील यांनी केली आहे.