पुणे

“लसीकरण  श्रेय वाद न्यायालयात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित काळभोर यांना केलेल्या मारहाण प्रकरणी कदम वाक वस्तीच्या महिला सरपंच यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश”

प्रतिनिधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर कदमवाक वस्ती येथील महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुजित काळभोर यांनी कोविड लसीकरण या ठिकाणी येऊन मला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.पण आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
कदमवाक वस्तीच्या महीला सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुजित काळभोर यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी कदमवाक वस्तीच्या महीला सरपंच गौरी गायकवाड, व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी दिल्याची माहिती एडवोकेट विजयसिंह ठोबरे यांनी दिली आहे.
कदमवाक वस्तीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुजित काळभोर याने मारहाण केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र तस काहीही घडले नव्हते याउलट मलाच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारले आहे. अशी तक्रार देण्यासाठी सुजित काळभोर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले होते.पण लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली नाही.
सुजित काळभोर यांनी ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली त्यानंतर न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी सुजित काळभोर व दोन प्रत्यक्ष साक्षीदार यांची शपथेवर तपासणी करून न्यायिक दखल घेत खटला चालविण्याचे आज (गुरुवारी )आदेश दिले.
या प्रकरणी कदमवाक वस्तीच्या महीला सरपंच गौरी गायकवाड, महेश काळभोर, चित्तरंजन गायकवाड, अमोल काळभोर ,सचिन काळभोर, अविनाश ( पप्पू) बडदे या सर्व आरोपी विरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी कटला चालू करण्याचे आदेश दिले आहेत.