पुणे

पुण्यातील आणखी एका सावकाराच्या पोलिसांनी आवळाल्या मुसक्या, सावकाराने एक लाखाच्या बदल्यात केले होते ६ लाख रुपये वसुल…!

पुणे जिल्ह्यात अजूनही खासगी सावकारीमुळे अनेक लोकांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे याच कारणास्तव काही लोकांना आपल्या शेतीला, घराला गमवावे लागण्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळतात काही वेळेस मारहाणीची प्रकरणे तर काही वेळेस आत्महत्तेची ही प्रकरणे समोर आली आहेत, कारण लोकांना या सावकारी लोकांची फार भीती किंवा दहशत असते याच कारणास्तव हे सावकार लोक मस्तावलेले आहेत आणी म्हणूनच अवैध्य सावकारांचे कंबर्डे मोडण्याचे काम सध्या पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

आणखी एका नवीन प्रकरणात खासगी सावकाराला पोलिसांनी दणका दिला आहे, एक लाखांच्या मोबदल्यात ६ लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार सिंहगड रोड येथे घडला आहे, या प्रकरणात 1 लाखाच्या बदल्यात 6 लाख देऊनही अजून अडीच लाखाची मागणी करणाऱ्या व धमक्या देणाऱ्या सावकाराच्या सिंहगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

एका तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर सिंहगड पोलीसांनी गुन्हा दाखल करून सावकार नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय २४,)जांभूळवाडी रोड) याला अटक केली आहे.

तक्रारदार व सावकार दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत, तक्रारदार यांनी आरोपीकडून १५ टक्के व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे आणी त्याच्या बदल्यात त्यांनी ऑनलाईन आणि फोन पे द्वारे अशा विविध प्रकारे ५ लाख ९५ हजार रुपये दिले असल्याचे सांगितले, तरीही अजून अडीच लाख रुपयांची मागणी केली जात होती तसेंच पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत असल्याने जवळ पैसे नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून थोडीशी हिम्मत करून सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणी पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ अटकेची कारवाई केली, पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.