कात्रज मध्ये पूर्वी गाव असल्याने अत्यंत छोटा कारभार होता,त्याला अनुसरून गावात पोस्ट ऑफिस होते परंतु ती जागा खाजगी मालकाची होती त्या मुळे कामकाज करताना अत्यंत अडचणीत काम करावे लागत होते.खाजगी जागा मालकाने आपली जागा खाली करून देण्याचा तगादा लावल्या मुळे पुढे दत्तनगर ला पुन्हा खाजगी जागेचा आधार घ्यावा लागला.ज्या विभाग च्या माध्यमातून केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा होतो त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित बसण्यास जागा नसेल तर काय? या विचारातुन कात्रज मधील भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांनी कात्रज चे पोस्ट ऑफिस सरकारी मालकीच्या व प्रशस्त जागेत सुरू करण्याचा चँग बांधला आणि त्यांच्या पत्नी सौ.मनीषा ताई राजाभाऊ कदम यांना नागरिकांनी नगरसेविका म्हणून २०१७ साली निवडून दिल्यावर त्यांनी राजकीय सत्तेच्या आधारावर केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता व पुणे महानगर पालिकेच्या सत्तेचा आधार घेऊन दोन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कात्रज मधील राजस सोसायटी मधील पुणे महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर भरगोस आर्थिक निधी महानगर पालिके कडून घेऊन दुमजली सुसज्ज इमारत बांधून त्या ठिकाणी प्रशस्त असे पोस्ट ऑफिस चे कार्यालय उभारले आहे.
या कार्यालयाची प्रत्यक्ष सुरवात काही दिवसात होणार आहे.अनेक दिवस कात्रज मधील नागरिकांची सुसज्ज पोस्ट ऑफिसची मागणी या मुळे पूर्ण होणार आहे.