हवेली प्रतिनिधी:- अमन शेख
लोणी काळभोर शहर पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे, कायदा-शांतता-सुव्यवस्था तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चोऱ्या करणारे तसेच शरीर व मालमते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवुन त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतचे आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार याना दिले आहेत.
लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी लोणी काळभोर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांना पडताळणी करून त्यांचेवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना इतर आदेश पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना दिले, त्यानुसार अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोन्या ऊर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ वय २४ वर्षे रा.नवीन कॅनॉल जवळ, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, लोणी काळभोर ता. हवेली जि. हा वारंवार गुन्हे करीत असून त्याचेवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत करणे बेकायदेशिरपणे धार-धार शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवुन वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे, हत्याराच्या धाकाने दहशत पसरविणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याचा भितीमुळे लोकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याबाबतची माहिती मिळाल्याने दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर शहर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी सदर गुन्हेरांवर एम. पी.डी.ए, कायद्यान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यास एक वर्षे कालावधीकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश दिला आहे, पोलीस आयुक्तांची एम. पी. डीए, कायदयांतर्गत आतापर्यंत करण्यात आलेली ही ७ वी कारवाई आहे, अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते पोलीस नाईक संदिप धनवटे यांनी केली आहे.