वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची धडाकेबाज कामगिरी
हडपसर तपास पथकाकडून कारवायांचा वेग वाढला
बिहार, दिल्ली पाठोपाठ राजस्थान येथून आरोपींना विविध गुन्ह्यांतून अटक
प्रेम संबंधातून व्यापार्याचे अपहरण झाल्याची पूष्टी
पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन )
मांजरी येथील व्यापारी अपहरण प्रकरणात हडपसर पोलीसांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून मुख्य आरोपीस राजस्थान येथून अटक करण्यात यश मिळविले आहे. बिहार, दिल्ली पाठोपाठ राजस्थान येथून आरोपींना अटक करून हडपसर पोलीसांनी तपासाचा ‘स्पीड’ दाखवून दिला आहे.
दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास ललीत चौधरी या व्यापार्याचे हरिओम व्हरायटिज मांजरी या दुकानातून अपहरण झाले होते. अपहत व्यापारी दुसर्या दिवशी वसई टोल नोका येथून सूटका करून हडपसर येथे परत आला होता. सदर अपहरण प्रकरणातील आरोपींबाबत तपास करण्या संदर्भात परिमंडळ-५ उपायुक्त व्रिकांत देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या.
व्यापारी ललीत चौधरी यांच्याकडे पोलीसांनी सखोल विचारपूस केली असता कैलास या इसमाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचे उघडकीस आले. सदर आरोपी कैलास हा राजस्थानकडे गेल्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाचे सपोनि विजयकुमार शिंदे , उपनि अविनाश शिंदे व संदीप राठोड यांनी पुष्टी केली. यावेळी गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी महत्वपूर्ण सूचना देवून तपासपथकातील कर्मचारी सुशील लोणकर, अतुल पंंधरकर, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे यांचे पथक राजस्थान येथे रवाना केले. यावेळी पथकाने मुख्य आरोपी कैलासराम सोहनलाल जाट, वय-३५ रा.जाटोंकाबास ता.रोहट जि.पाली यास मोठ्या शिफातीने ताब्यात घेतले व हडपसर येथे आणण्यात आले. सदर आरोपीस न्यायालयाने दि.५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी कैलासराम सोहनलाल जाट याच्याकडे सखोल चौकशी केली असता व्यापारी ललीत चौधरी याचे त्याचे आत्याच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध असून त्यास विरोध होता. यामुळे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड व गोविंद रा.सर्व जालोर यांच्या मदतीने केरळहून राजस्थान येथे बोलेरो गाडीतून जाताना ललीत चौधरी याचा अपहरण करून त्यास जीवे मारण्याची धमकी देवून वसई टोल नाका येथे सोडून दिल्याचे सांगितले. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि विजयकुमार शिंदे करीत आहेत.
हडपसर पोलिसांच्या एका महिन्यात परराज्यात 3 कारवाया…
हडपसर पोलिसांनी नोव्हेम्बर 22 या एकाच महिन्यात 3 वेगेवेगळ्या राज्यात जाऊन हडपसर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक केले आहेत प्रथम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फुरसुंगी तील मोबाईल शॉपी फोडल्याच्या गुन्ह्यात 24 लाखाच्या मुद्देमालासह मुख्य आरोपी बिहार मधून ताब्यात घेतले एक आठवड्याने मांजरी येथील मोरे नर्सरीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी दिल्लीतून तर आज मांजरी येथील राजस्थानी व्यापाऱ्याच्या अपहरण केस मधील मुख्य आरोपी राजस्थान मधून ताब्यात घेतला आहे