पुणे

बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट करणार शक्तिप्रदर्शन : पुण्यात भव्य मेळाव्याचे आयोजन : पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांची चाचपणी, “शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे व शहरसंघटक अजय भोसले यांची पत्रकारपरिषदेत माहिती”

:- भाजपसह युतीत ४४ जागांवर दावा
:- पुण्यात शिंदे गटाच्या मेळाव्याकडे सर्वच पक्षीयांचे लक्ष

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पुण्यात शिंदे गटाचा बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb Shivsena) पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिंदे गट होणार्‍या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करून पुणे मनपा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांची चाचपणी करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप बरोबर युती ४४ जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात शिंदे गटाच्या मेळाव्याकडे सर्वच पक्षीयांचे लक्ष लागले आहे.
पुणे शहराध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Nana Bhangire) व शहर संघटक अजय (बापू) भोसले (Ajay Bapu Bhosale) यांनी या मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली असून अंदाजे २० हजाराच्या वर कायकर्ते जमा होणार असल्याचे समजते. नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल येथे दुपारी ४ वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांची उपस्थिती राहणार आहे तर भरत गोागवले (Mla Bharat Gogawale) (प्रतोद, शिवसेना), मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील, विजयबापू शिवतारे, नरेश मस्के, खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात शिंदे गटात कोण प्रवेश करणार याबाबत सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे. अजय बापू भोसले यांनी मातब्बर नेत्यांना शिंदे गटात खेचल्याचे राजकिय विश्‍लेषकांनी अंदाज बांधले आहेत. तर काही मातब्बर नेते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत.